आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरचा 'सत्यमेव जयते' शो आता मराठीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच अभिनेता आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचे दुसरे पर्व येत्या 3 मार्चपासून छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. दुस-या पर्वाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलीय. या पर्वात हा शो हिंदीसह तब्बल आठ भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. हा शो मराठीत डब केला जाणार असून यात आमिरला आवाज दिलाय प्रसिद्ध बॉलिवूड मिमिक्री आर्टिस्ट डॉ. सुमेध शिंदे यांनी.
हिंदी आणि मराठीसह इंग्रजी, बंगाली, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि पंजाबी भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
ज्या प्रेक्षकांना हा शो हिंदीत नकोय त्यांना स्टार प्लसऐवजी स्टार प्रवाह वाहिनीवर या शोची मराठी आवृत्ती बघायला मिळेल. हा शो मराठीत डब होणार असल्याची माहिती देणारे प्रोमोज नुकतेच दिसू लागले आहेत.
अजय देवगण, शाहिद कपूर, फरहान अख्तर, हृतिक रोशनसह अनेक बॉलिवूड सेलेब्सचे आवाज काढण्यात माहिर असलेले डॉ. सुमेध मुळचे मुंबईचे असून या शोसाठी त्यांनी आमिरला आपला आवाज दिला आहे.