आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Satyamev Jayte 2 Coming Soon With Dasrath Manjhi

22 वर्षे एकट्याने खडक खोदून बनवला रस्ता, आता आमिर सांगणार त्यांची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सत्यमेव जयते 2'ची सुरूवात आमिर खान बिहारमधील एका गावातील जेष्ठ व्यक्तीची कहाणी सांगून करणार आहे. आमिर 22 फेब्रुवारीला बिहारमधील नागरिक दशरथ मांझी यांच्या गहलोर गावात जाणार आहे. आमिर त्याच्या शोचा पहिला एपिसोड मांझी आणि त्यांच्या गावाला समर्पित करणार आहे. हा एपिसोड खास असण्याचे कारण म्हणजे, मांझी यांनी 22 वर्ष एकट्याने खडक खोदून गावासाठी रस्ता बनवला आहे.
'दैनिक भास्कर'सोबत विशेष बातचीत दरम्यान आमिरने सांगितले, की दशरथ मांझी यांचे व्यक्तीमत्व खूपच प्रेरणादायी आहे. तुम्हाला काही करण्याची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही एकटे अशक्य गोष्ट शक्य करू शकता. याची जाणीव दशरथ मांझी यांनी त्यांच्या कामातून करून दिली आहे. त्यांनी एकट्याने 22 वर्षांपूर्वी खडक खोदून त्यांच्या गावासाठी 360 फुट लांबीचा 30 फुट रूंदीचा रस्ता बनवला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सविस्तर बातमी...