आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सत्यमेव जयते’साठी आमिर खान 10 दिवस रिमांडहोममध्ये मुक्कामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - अभिनेता आमिर खानमुळे लोकप्रिय झालेल्या ‘सत्यमेव जयते’चे दुसरे पर्व मार्चमध्ये सुरू होणार आहे. आमिर खान त्यासाठी खूपच उत्साहित आहे. या शोचे दुसरे पर्व बारा आठवडे चालणार आहे. चार-चार एपिसोडच्या तीन टप्प्यांत विविध समस्यांची मांडणी केली जाणार आहे. पैकी एक भाग बालगुन्हेगारांवर आधारित आहे. त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी आमिर खान इंदूरच्या शाळेत जाऊन दहा दिवस तेथेच मुक्काम ठोकणार आहे. मुलांच्या डोक्यात गुन्हेगारीच्या कल्पना कशा निर्माण होतात, त्या कशा वाढत जातात हे जाणून घेण्याचा आमिरचा प्रयत्न आहे. बालमनातील गुन्हेगारी समजून घेण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे आमिरने सांगितले.