आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सत्यमेव जयते -2’ मध्ये आमिर खानचा ‘बेटी’ विशेष कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या भागामध्ये स्त्री भ्रूणहत्येसह महिला गुन्हेगारी विषयांना आमिरने प्रामुख्याने चर्चेसाठी घेतले होते. या वर्षी सुरू होणार्‍या या कार्यक्रमाच्या दुसर्‍या शोसाठीदेखील अशीच योजना बनवली जात आहे. मात्र, यातील विषय गुप्त ठेवले जात आहेत. या भागामधील कार्यक्रमांतदेखील स्त्री भ्रूणहत्येशी संबंधित विषयांना प्राधान्य दिले जाईल. आमिर आपल्या तीन मुलांमध्ये मुलगी इराच्या अधिक जवळ आहे. सत्यमेव जयते -2 च्या या स्वरूपासाठी ‘बेटी झिंदाबाद’ या स्लोगनची टोपी तयार करण्यात आली आहे. बांद्रयामधील फ्रीडा घरात त्याच्या लिव्हिंग रूममध्ये म्युझिक सिस्टिमशी संबंधित गाणी आणि अल्बमचे कलेक्शन त्याच्या आवडीनुसार आकर्षकरित्या ठेवण्यात आले आहे.
त्याच ठिकाणी लाल रंगाची ‘बेटी जिंदाबाद’ या स्लोगनची टोपी ठेवण्यात आली आहे, जी आमिरच्या सतत नजरेसमोर असते. यामुळे आपल्या आसपासच्या वातावरणाशी आमिर प्रोजेक्ट थीमसोबत जोडत आहे. जसे आमिरने धूम-3 मध्ये आपल्या भूमिकेशी सुसंगत असणारी टोपी चित्रपट रिलीज होण्याच्या एक महिना अगोदर घालणे सुरू केले होते, जी रिलीजच्या तीन आठवड्यांनंतरदेखील घातली होती.