आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Talks His Heart Out For The Second Season Of Satyamev Jayate

जाणून घ्या 'सत्यमेव जयते 2'साठी आमिरने का बनवले केवळ 4 एपिसोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 2 मार्च 2014पासून छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. आमिर त्याचा चर्चेतील आणि लोकप्रिय टीव्ही शो 'सत्यमेव जयते'चा दुसरे पर्व 2 मार्चपासून प्रसारित करणार आहे. शोच्या पहिल्या पर्वात स्त्रीभूण हत्या, महिलांवरील अत्याचार, शिक्षणाच्या समस्या यांसारखे गंभीर विषयी आमिरने समोर आणले होते.
'सत्यमेव जयते 2'ची टॅगलाइन 'जिन्हे देश की फीक्र है' असे आहे. आमिर सध्या त्याच्या शोचे प्रमोशन करत आहे. सोबतच, त्याने यावेळी शोमध्ये काही बदल केले आहेत. शोच्या दुस-या पर्वाबाबत आमिरने माध्यामांसोबत बातचीत केली आहे.
दुस-या पर्वात चारच एपिसोड का?
'मला वाटते, की प्रत्येक मुद्यावर लोक आपोआप जोडले जावे आणि या शोसोबत दिर्घकाळ राहावे. या शोमधील प्रत्येक मुद्दा गंभीर आहे आणि 3 महिन्यानंतर आम्ही आणखी चार एपिसोडचा हा शो पुढे चालू ठेवणार आहोत.'
आमिरमध्ये 'सत्यमेव जयते'मुळे कोणता बदल झाला?
'मला कोणत्या खास बदलाबद्दल नाही माहित. परंतु मी एका व्यक्तीच्या रुपात पुढे चाललो आहे आणि प्रत्येक विषयाची मला माहिती मिळत आहे. मला प्रत्येक समस्या आणि विषयाने हैराण केले आहे. मग तो विषय चांगला असो अथवा वाईट. सर्वात महत्वाचे म्हणजे, मी लोकांना माफ करायला शिकलो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा आमिरने कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर दिले...?