प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री आमना शरीफने तिचा प्रियकर अमित कपूरसोबत लग्न केलं. दोघं 27 डिसेंबरला लग्नाच्या बेडित अडकले. अमित कपूर एक निर्माता आहे. काही दिवसांपूर्वी आमनाने आफताब शिवदासनी आणि राजीव खंडेवालना डेट केलं होतं. आमना स्टार प्लसवर प्रसारित होणा-या 'कहा तो होगा' या टीव्ही मालिकेपासून प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ती काही सिनेमामध्ये सुध्दा दिसली होती. आता तिच अमित कपूरसोबत लग्न झालं आहे.
लग्नानंतर त्यांनी मुबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीत अभय देओल, प्रीती देसाई, संजीदा शेख, मोनी रॉय, आमिर अली, आरजू गोवारिकर, रणदीप हुड्डा याचबरोबर अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
यानिमित्ताने आमना म्हणाला, की तिने शेवटी अमितमध्ये तिच्या स्वप्नाचा राजकुमार पाहिला, ती अमितला दोन वर्षापूर्वी भेटली होती. दोघांनी एकमेकांनी कधीच डेट नाही केलं आणि एक दिवस लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमनाने ड्रेस डिजायनर मनीष मल्होत्राकडून बनवलेला ड्रेस घातला होता. तिने घट्ट निळ्या रंगसोबत गुलाबी बॉर्डरचा ड्रेस घातला होता.
बघा आमना आणि अमितच्या रिसेप्शन पार्टीची काही खास छायाचित्रे...