आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aamna Sharif Promote Her Upcoming Movie Ek Villian In Pavitra Rishta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एक व्हिलन'च्या प्रमोशनसाठी 'पवित्र-रिश्ता'च्या सेटवर पोहोचले आमना-रितेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('एक व्हिलन'च्या दृश्यात रितेश देखमुख आणि आमना शरीफ)
आमना शरीफ हे नाव स्मॉल इंडस्ट्रीतील परिचयाचे नाव आहे. लवकरच आमना 'एक व्हिलन' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अलीकडेच आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आमना तिचा को-स्टार रितेश देशमुखसह 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेटवर पोहोचली होती. या सिनेमात रितेशने आमनाच्या पतीची भूमिका साकारली आहे.
काहीसा असा असेल प्रमोशनल एपिसोड - मालिकेत राकेश (रितेश देशमुख) जो मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवतो, तो तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जातो. त्याच्या घरात चोरी झालेली असते. तक्रार दाखल करत असताना पोलिस राकेशला सुचना करतात, की शहरात एक माथेफिरु व्यक्ति फिरत असून स्त्रियांना तो आपले लक्ष्य बनवतो. राकेश पोलिस स्टेशनमधून बाहेर पडताच त्याला मानव आणि अर्चना दिसतात. राकेश, मानव आणि अर्चनाला ओळखतो. कारण काही दिवसांपूर्वीच हे दोघे फोन दुरुस्तीसाठी राकेशच्या दुकानात गेले होते. राकेश आणि मानव यांची अशाप्रकारे भेट होते. त्यानंतर तो लगेचच आपल्या घरी जातो. कारण त्याची पत्नी सुलोचना (आमना शरीफ)ला त्याला पिक्चर दाखवायला घेऊन जायचे असते. अशाप्रकारे सिनेमाची कथा मालिकेशी जोडण्यात आली आहे.
'पवित्र रिश्ता'च्या सेटवर आल्यानंतर आमनाने आपल्या जुन्या दिवसांना उजाळा दिला. तर रितेशनेसुद्धा मालिकेत काम करणे एन्जॉय केले.