आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: आठ आठवड्यांनी संपला आर्यचा प्रवास, घरातून झाला आऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आर्य बब्बर)
मुंबई- आठ आठवड्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात राहिल्यानंतर अखेर आर्य बब्बरला या आठवड्यात घराबाहेर जावे लागले. या आठवड्यात एविक्शनसाठी पुनीत, गौतम, करिश्मा आणि आर्य नॉमिनेट होते. व्होटिंगच्या आधारे आर्यला घराबाहेर जावे लागले.
सुरुवातीच्या दिवसांत शांत-शांत राहणारा आर्य काही आठवड्यांपूर्वीच चांगला गेम खेळायला लागला होता. घरात त्याची सर्वांत चांगली बाँडिंग डिआंड्रा, करिश्मा आणि उपेनशी होती. मात्र, उपेन त्याचा सर्वात चांगला मित्र होता.
घरातून बाहेर झाल्यानंतर आर्यला सलमानने विचारले, की पुढील आठवड्यात कुणाला कॅप्टनच्या स्पर्धेत पाहशील. त्यावेळी आर्यने उपेनचे नाव घेतले. आता आर्य आपल्या चांगल्या मित्राला दुस-यावेळेस कॅप्टनच्या रुपात पाहतो की नाही? हे पाहणे रंजक ठरेल.