आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांचा पती आणि 19 वर्षांच्या पत्नीची \'सुहागरात\', मालिकेवर झाली ही कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'पहरेदार पिया की' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वादात अडकली आहे. 9 वर्षांच्या मुलाचे 19 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न आणि त्यानंतर हनिमून सिक्वेन्स दाखवल्यानंतर या मालिकेला चांगलाच विरोध होत आहे. या प्रकरणी ब्रॉडकास्टींग कंटेंट कम्पलेंट काऊंसिल (BCCC) मध्ये एक तक्रार करून शो बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही याचिका दाखल केल्यानंतर शोचा वेळ बदलण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता हा शो 16 ऑगस्टपासून रात्री 10 वाजता टेलिकास्ट होणार आहे. 

अशी होती याचिका.. 
- इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मिनिस्टर स्मृती यांना पाठवण्यात आलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, 'पहरेदार पिया की' मालिकेत 10 वर्षाच्या मुलाला त्याच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलीच्या मागे पळताना आणि तिच्या भांगेत सिंदूर भरताना दाखवले जात आहे. 
- ही मालिका रात्री 8:30 वाजता एका वाहिनीवर दाखवली जाते. हा फॅमिली स्लॉट असतो. या मालिकेतून दर्शकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. आम्हाला सर्वांनाच या मालिकेवर बंदी हवी आहे, असे याचिकेत म्हटले आहे. 
- लहान मुलांवर या मालिकेचा परिणाम होऊ नये अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. 

दाखवला जात आहे हनिमून.. 
- काही दिवसांपूर्वी मालिकेतील हनिमून सिक्वेन्स शूट करण्यात आला होता, त्यावेळीच ही मालिका वादात अडकली होती. 
- सध्याच्या एपिसोड्समध्ये हा सीन दाखवला जात आहे. 9 वर्षांचा मुलगा आणि 19 वर्षांची तरुणी यांचा रोमान्स यात दाखवला आहे. 
- हे एवढ्यावरच थांबत नाही. मालिकेत अनेक आक्षेपार्ह डायलॉगही आहेत. त्यामुळे एका वर्गातील लोकांना ही मालिका दाखवली जाऊ नये असे वाटते. 

9 वर्षांचा नवरदेव आणि 19 वर्षांची नवरी 
- 'पहरेदार पिया की' दिया आणि प्रिन्स कुवर रतन सा यांनी कथा आहे. यात 19 वर्षांच्या तरुणीचे लग्न 9 वर्षाच्या मुलाबरोबर झालेले आहे. 
- मालिकेच्या स्टार कास्टमध्ये मुलगा रतन सिंहच्या रोलमध्ये बाल कलाकार अफान खान आहे. तर 19 वर्षांची तरुणी राजकुमारी दिया सिंगच्या भूमिकेत  तेजस्वी प्रकाश आहे. 
- कथेनुसार रतनच्या आई वडिलांचा एका ब्लास्टमध्ये मृत्यू होतो. मरताना रतनचे वडील दियाला रतनबरोबर लग्न करण्यास सांगतात. तिने त्याचे संरक्षण करावे असे त्यांना वाटते. 
- या मालिकेत राजस्थानची कला आणि संस्तृतीही दाखवली जात आहे. राजपूत समाजाची परंपरा यात दाखवली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शोमधील काही सिन्सचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...