आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 रु. घेऊन मुंबईला आला होता हा अभिनेता, TVच नव्हे सिनेमांतही केले काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका TV कॅरेक्टरमध्ये अभिनेता अनवर फतेहन - Divya Marathi
एका TV कॅरेक्टरमध्ये अभिनेता अनवर फतेहन
ग्वालियर/भोपाळ: टीव्ही आणि अनेक सिनेमांत काम केलेल्या अभिनेता अनवर फतेहन सोमवारी (25 एप्रिल) ग्वालियरमध्ये आले होते. अनवर यांनी ग्वालियरच्या जेडी इंस्टीट्यूट अँड फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना मॉडेलिंग आणि अभिनया संबंधित माहिती दिली. अनवर कधीकाळी 30 रुपये घेऊन अभिनेता बनण्यासाठी मुंबईला आले होते. 'महाभारत' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने अनेक मालिका आणि सिनेमांत काम केले आहे.
महिलेची भूमिका साकारून केली करिअरला सुरुवात...
- अभिनयाविषयी विद्यार्थ्यांना टीप्स देऊन ते म्हणाले, की जर तुम्हाला भूमिकेत उतरता आले तर तुम्हाला सहज इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होता येईल.
- त्यामुळे अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्वत:ची पर्सनॅलिटी सिध्द करा.
- अनवर यांनी सांगितले, की 'मी बालपणीपासूनच सुंदर होतो. त्याकाळी रामलीलामध्ये पुरुषच महिलांच्या भूमिका करत होते. मीसुध्दा माझ्या करिअरची सुरुवात अशाच रामलीलाच्या पात्रातून केली.'
- ते म्हणाले, की 1976मध्ये मी 30 रुपये आणि डोळ्यांमध्ये अभिनयाचे स्वप्न घेऊन देहरादूनहून मुंबईला आलो होतो.
- अनवर यांनी दूरदर्शनच्या 'शांती-एक औरत की कहानी' मालिकेत डॉ. आफताब खान पात्रातून टीव्ही इंडस्ट्रीत सुरुवात केली होती.
'शकुनी'साठी वाचली पुस्तके...
- एका मालिकेत 'महाभारता'चा एक भाग दाखवायचा होता. त्यात माझी भूमिका शकुनी मामाची होती.
- मी त्या भूमिकेत परफेक्ट बसण्यासाठी 'बूंद' पुस्तक वाचले. य पुस्तकात मला शकुनी आणि त्याच्या बहीण-भावाचे नाते माहित झाले.
- शकुनीच्या भूमिकेत स्वत:ला झोकून देण्यासाठी मी 6वेळा महाभारत वाचले.
- अनवर सांगतात, त्यानंतर मी दिग्दर्शक संजय खान यांना शूटिंगसाठी होकार दिला. कारण मला शकुनीच्या पात्र समजून घेऊनच अभिनय करायचा होता.
टीव्ही इंडस्ट्रीत वाढल्या संधी...
- मीडियासोबत बातचीत करताना अनवर म्हणाले, तरुणांसाठी संधी वाढल्या आहेत. त्याचे कारण आहे, टीव्हीवर मालिकांची वाढलेली संख्या.
- मालिकेतून टॅलेंटेड तरुणांना चांगले एक्सपोजर मिळत आहे. त्यामुळे टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये टॅलेडची कमी नाहीये.
- अनवर यांनी तरुणांना सांगितले, की संघर्षाला घाबरू नका आणि याचा धाडसाने सामना करा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अनवर फतेहन निवडक PHOTOS...