आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमेडी नाइट्स विथ कपिल\' नव्हे, आता \'कॉमेडी नाइट्स विथ अर्शद\', का जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या मंचावर होस्ट अर्शद वारसीसोबत अजय देवगण आणि तब्बू)

हजरजबाबी उत्तरं, मिश्किल टिप्पण्या, आणि खोड्या करून टीव्ही प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या कपिल शर्माने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. आता कपिल नसल्यामुळे हा शो बंद पडतो की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... तर तसे मुळीच नाहीये. कपिलच्या जागी आता एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता त्याच्या या शोची धुरा सांभाळताना दिसणार आहे. अभिनेता अर्शद वारसी आता हा शो होस्ट करणार आहे. 'मुन्नाभाई MBBS, 'लगे रहो मुन्नाभाई'सारख्या सिनेमांतून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून देणारा अर्शद 'कॉमेडी नाइट्स'मध्ये आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अलीकडेच अर्शदने अभिनेता अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांच्यासोबत कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या नवीन भागाच्या एपिसोडचे शूटिंग केले. ही टीम आपल्या आगामी 'दृश्यम' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने शोमध्ये आली होती. एपिसोडच्या शूटिंगनंतर अर्शदने ट्विट केले, "OMG...Had an Awesome time with Ajay D, Tabu & Shriya Saran at Comedy Night's with Kapil. I hosted the show, hope you like it,"
कपिलची जागा अर्शद वार्सी घेणार असला तरी शोमधील इतर कलाकार मात्र तेच असणार आहेत. आता अर्शद आपल्या अँकरिंगने शोवरील कपिलची छाप पुसून काढण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये 'दृश्यम'च्या टीमने केलेली धमाल...