आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Avinash Sachdev Threatens To Break The Media Camera During His Wedding

स्वत:च्या लग्नात मीडियाला पाहून भकडला TV अॅक्टर, कॅमे-यांची केली तोडफोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अविनाश सचदेव)
मुंबई- 'छोटी बहू' आणि 'इस प्यार को क्या नाम दू' मालिकांमधून प्रसिध्द झालेला अविनाश सचदेवने अलीकडेच गर्लफ्रेंड शलमाली देसाईसोबत लग्न केले. हे लग्न अहमदाबादच्या पंचतारांकित हॉटेल सिलवासामध्ये झाले. यादरम्यान त्याने माध्यमांसोबत गैरवर्तण केल्याची घटना समोर आली आहे. अविनाशने आपल्या लग्नाला कव्हर करण्यासाठी माध्यमांना बोलावले नव्हते. तरीदेखील काही माध्यमांनी या लग्नाच उपस्थिती लावली होती. याचा राग अविनाशने माध्यमांवर काढला.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, अविनाश माध्यमांचे प्रतिनिधी आपल्या लग्नात आलेले पाहून रागाने लालबूंद झाला. त्याने माध्यमांच्या कॅमे-यांची तोडफोड केली. अविनाशचे म्हणणे होते, की एखाद्या सेलिब्रिटी इच्छा नसतानाही माध्यमे त्यांच्या लग्नाच्या बातम्या कव्हर करण्यासाठी का येतात. यादरम्यान अविनाशने लग्नाच्या काही विधी करण्यासदेखील नकार दिला.
इस प्यार को क्या नाम दू-2मध्ये शलमालीसोबत झाली होती ओळख-
अविनाश आणि शलमाली यांचा प्रेमविवाह आहे. दोघांमध्ये 'इस प्यार को क्या नाम दू'च्या दुस-या सीजनमध्ये जवळीक वाढली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अविनाश आणि शलमाली यांचे सोबतचे काही खास फोटो...