आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

USमध्ये राहतो 'महाभारता'चा धृतराष्ट्र, वाचा कुणाच्या ऑफरने बदलली LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरजाशंकर पंजाबचे आहेत, थिएटर केल्यानंतर ते टीव्ही इंडस्ट्रीत आले होते. - Divya Marathi
गिरजाशंकर पंजाबचे आहेत, थिएटर केल्यानंतर ते टीव्ही इंडस्ट्रीत आले होते.
पटियाला/चंदीगढ: अभिनेते गिरिजाशंकर यांनी अनेक टीव्ही आणि सिनेमांत झळकले आहेत. परंतु लोक त्यांना 'महाभारता'च्या धृतराष्ट्र आणि 'बुनियाद' मालिकेतील रामाच्या भूमिकेसाठी ओळखतात. 80च्या दशकात या दोन्ही मालिका लोकप्रिय होत्या. गिरिजाशंकर पंजाबचे आहेत, सध्या ते हॉलिवूडमध्ये काम करत आहेत. चंदीगढ व्हिजिटदरम्याने त्यांनी आमच्यासोबत खास बातचीत केली. त्यांनी पटियालाहून यूएसला स्थायिक होण्याची कहाणीसुध्दा सांगितली.
गिरिजाशंकर यांना नव्हते व्हायचे अॅक्टर?
- गिरिजाशंकर यांनी सांगितले, की त्यांचे बालपण पटियालामध्ये गेले. त्यांना एअरफोर्समध्ये जाण्याची ईच्छा होती.
- परंतु वयामुळे ते परिक्षा पास होऊ शकले नाही.
- कॉलेजनंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठीसुध्दा त्यांनी ऑडिशन दिले आणि सिलेक्टसुध्दा झाले. परंतु काही कारणास्तव तिथे जाऊ शकले नाहीत.
- नंतर विचार केला, की पटियालामध्ये राहून अभिनयाचे शिक्षण घ्यावे. नशीब होते, की त्याचवेळी माझी भेट माझे गुरु हरपाल टिवाणी यांच्याशी झाली.
- त्यांच्यासोबत पाच वर्षे राहिलो, पाच वर्षांत अनेक थिएटर केले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.
- या विश्वासाने दिल्ली आणि पुन्हा मुंबईमध्ये थिएटर केले. मुंबईच्या प्रसिध्द थिएटर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
अभिनयापूर्वी धृतराष्ट्र कोण माहित नव्हते?
- गिरिजाशंकर यांनी सांगितले, की महाभारतामध्ये अभिनय करण्यापूर्वी धृतराष्ट्राचे पात्र मला माहित नव्हते.
- ही भूमिका मिळाली त्यावेळी माझे वय 28 वर्षे होते. बीआर चोप्रा यांनी मला धृतराष्ट्रचे गंभीर पात्र ऑफर केले होते.
- आधी मला वाटले होते, की या भूमिकेत एवढा दम नाहीये. परंतु मी जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा माहित झाले, की इतर पात्रांपेक्षा हे कठिण होते.
- या भूमिकेने गिरिजाशंकर यांचे आयुष्य बदलले.
कोण आहे गिरिजाशंकर?
- पटियालामध्ये जन्मलेले गिरिजाशंकर अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.
- त्यांनी पटियाला पंजाबी यूनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले आहे.
- गिरिजाशंकर हिंदी, पंजाबी, तामिळशिवाय हॉलिवूडच्या सिनेमांतसुध्दा झळकले आहेत.
- सध्या ते फॅमिलीसोबत अमेरिकेत राहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, गिरिजाशंकर हॉलिवूडविषयी काय म्हणतात आणि धृतराष्ट्राची भूमिका करण्यासाठी त्यांनी कोणती तयारी केली होती...