आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Ravi Dubey Upset By Rumors Of Linkup With Shargun

निया शर्मासह लिंकअपच्या अफवांमुळे रवि दुबे नाराज, जाणून घ्या काय आहे प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील स्टार रवि दुबे सध्या थोडा नाराज असल्याचे कळाले आहे. नाराज होण्याचे कारणही तसे योग्य आहे. ऐकिवात आहे, की रवि दुबेचे लिंकअप अभिनेत्री निया शर्मासोबत विनाकारण जोडले जात असल्याने तो नाराज आहे. त्याच्या सांगण्यानुसार असे काहीही नाहीये.
रवि दुबे आणि निया शर्मा झी टीव्हीवर येणा-या एका शोमध्ये एकत्र काम करत आहेत. अलीकडेच, दोघेही एका इलेक्ट्रॉनिक्स चॅनलवर रात्री उशीरा एका कॉफी शॉपमध्ये दिसले. दोघेही याबद्दल नाराज आहेत, की त्यांच्याविषयी चुकीची अफवा पसरवली जाते आहे.
रवि काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री सरगुण मेहतासह लग्नगाठीत अडकला आहे. त्यामुळे तो नाराज होणे साहजिकच आहे. या जोडीने गोल्ड अवॉर्डमध्ये याविषयी स्पष्टीकरणसुध्दा दिले होते.
यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, सरगुण खूप शांत दिसली. तिला वाटते, की हा केवळ पब्लिक स्टंट आहे आणि पब्लिक स्टंट चांगले असतात. नग ते वाईट असो अथवा चांगले.
एवढेच नाही तर, निया शर्माने अलीकडेच, आपल्या टि्वटर अकाउंटवर आगामी शोची काही छायाचित्रे पोस्ट केली होती. त्यामध्ये निया आणि रवि लाँग ड्राइव्हवर जाताना दिसले. आता तुम्ही याला पब्लिक स्टंट म्हणा अथवा काहीही. परंतु बॉलिवूडमध्ये रवि आणि निया यांच्या लिंकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा निया आणि रवि दुबे यांची काही छायाचित्रे...