(डावीकडे मुलगी नियती, श्याम पाठकसोबत मुलगा पार्थ आणि पत्नीसोबत चिमुकला शिवम)
मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत पत्रकार पोपटलालची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते श्याम पाठक यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ते आणि त्यांची पत्नी तिस-यांदा आईवडील झाले आहेत. श्याम पाठक यांना पहिलेच एक मुलगी आणि मुलगा आहे. नियती आणि पार्थ ही त्यांची नावे आहेत.
Divyamarathi.com सोबत बातचित करताना श्याम पाठक म्हणाले, "आम्ही खूप आनंदी आहोत. तीन महिन्यांपूर्वीच आमच्या घरी बेबी बॉयचे आगमन झाले आहे. आम्ही त्याचे नाव शिवम ठेवले आहे. तो खूप स्वीट असून आपल्या क्यूट स्माइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतो."
मालिकेतील पोपटलाल हे पात्र गोकुलधाम सोसायटीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. सुंदर मुलीशी लग्न करण्याचे तो स्वप्न बघत असतो. रिअल लाइफमध्ये मात्र हे पात्र साकारणारे अभिनेते श्याम पाठक विवाहित असून तीन मुलांचे वडील आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, श्याम पाठक यांच्या फॅमिलीची ही खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर