(फाइल फोटो : विशाल ठक्कर)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता विशाल ठक्कर विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. शहरातील चारकोप पोलिस ठाण्यात विशालच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'पडोसन', 'जय बजरंगबली' आणि 'तारक मेहता का उल्टा चश्मा'सारख्या लोकप्रिय मालिकांत काम करणा-या एका अभिनेत्रीने शनिवारी (17 ऑक्टोबर) विशालच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिस सूत्रांनी सांगितले, की पीडित अभिनेत्रीच्या वैद्यकिय तपासणीत बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.
काय म्हणणे आहे अभिनेत्रीचे?
पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित अभिनेत्रीने सांगितले, की ती विशालसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. नंतर विशालच्या वाईट वागणूकीमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. तिच्या सांगण्यानुसार, '15 ऑक्टोबरला विशालने त्याच्या बर्थडेला चारकोप अपार्टमेंटमध्ये बोलावले आणि माफी मागून नात्याची नव्याने सुरुवात करण्यास सांगितले. यादरम्यान विशालने माझे शारीरिक शोषण केले. मी तिथून संधी शोधून पळ काढला आणि जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली.'
विशालने 'मुन्नाभाई एमबीबीएस'सारख्या सिनेमांत केले आहे काम-
विशाल ठक्करने 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'टँगो चार्ली'सारख्या सिनेमांसह 'वीर शिवाजी' आणि 'किस देश मे है मेरा दिल'सारख्या मालिकांत काम केले आहे.