आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये असे दिसतात TVचे \'कृष्ण\', कुणी निघून गेले अज्ञातवासात तर कुणी आहे वकील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वदमन डी बॅनर्जी - Divya Marathi
सर्वदमन डी बॅनर्जी
मुंबई - टीव्हीवर आपण अनेक अभिनेत्यांना श्रीकृष्णाच्या भूमिकेत बघितले आहे. रिल लाइफमध्ये कृष्ण बनलेल्या या अभिनेत्याना सामान्यांनी खराच कृष्ण समजून त्यांची पूजासुद्धा केली. आज गोकुळाष्टमी आहे. कृष्णाचे नाव येताच मनामध्ये टीव्हीवर कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांची आठवण नक्कीच येते. असेच एक अभिनेता आहेत रामानंद सागर यांच्या \'कृष्णा\' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेता सर्वदमन डी बॅनर्जी. कुणी व्हेटनरी डॉक्टर तर कुणी शिकवतो मेडिटेशन...
 
सर्वदमन आजही कृष्णाच्या भूमिकेतच लोकांच्या लक्षात आहेत. तसे पाहता कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांचे खासगी आयुष्य रंजक आहे. कुणाला फुटबॉल खेळणे पसंत आहे, तर आज एक अभिनेता लोकांना मेडिटेशन शिकवतो. कुणी व्हेटनरी डॉक्टर आहे. तर कुणी वकील आहे.  

सर्वदमन डी बॅनर्जी
सर्वदमन डी बॅनर्जी यांनी रामानंद सागर यांच्या गाजलेल्या \'कृष्णा\' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ही भूमिका एवढी गाजली, की लोक खासगी आयुष्यातसुद्धा त्यांची पूजा करायला लागले होते. सर्वदमन यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या \'आदि शंकराचार्य\' या सिनेमातसुद्धा मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. उत्तर प्रदेशात जन्मलेले सर्वदमन यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी हिंदीसह संस्कृत आणि तेलगू सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. आता सर्वदमन ऋषिकेशमध्ये वास्तव्याला असून तेथे लोकांना मेडिटेशन शिकवतात. 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयीच्या रंजक गोष्टी... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...