आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actors Child Actors Who Played Shree Krishna On TV

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बघा काळानुरुप छोट्या पडद्यावर बदललेली श्रीकृष्णाची विविध रुपं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


देव कुणी बघितला आहे ? त्याचे रंग-रुप कसे आहे ? हे कुणालाच ठाऊक नाहीये. मात्र 2 ऑक्टोबर 1988 रोजी बी.आर.चोप्रा यांनी टीव्हीवर 'महाभारत' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही मालिका बघण्यासाठी प्रेक्षक दर रविवारी सकाळी नऊ वाजता टीव्हीसमोर बसायचे. ज्यांच्या घरी टेलिव्हिजन सेट नव्हता, ते लोक शेजा-यांच्या घरी जाऊन ही मालिका बघायचे. या मालिकेत नितीश भारद्वाज श्रीकृष्णाच्या रुपात पडद्यावर अवतरले होते. त्यांचे श्रीकृष्णाचे रुप आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तेव्हापासून छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाचे दर्शन प्रेक्षकांना घडले. एवढ्या वर्षांत छोटया पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारणा-या अभिनेत्यांचे चेहरे बदलत गेले.

1993 साली रामानंद सागर यांनी रामानंद सागर, आनंद सागर आणि मोती सागर दिग्दर्शित 'श्रीकृष्णा' या मालिकेत श्रीकृष्णाच्या किशोर अवस्थेत अभिनेता स्वप्नील जोशी झळकला होता. तर तारुण्यातील भूमिका सर्वदमन बॅनर्जी या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेच्या दिग्दर्शकाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला होता.

सागर आर्ट्सने जुलै 2008 रोजी नव्या पिढीसाठी नव्या रुपात पुन्हा एकदा 'श्रीकृष्ण' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. रोचक गोष्ट म्हणजे इंडियन टेलिव्हिजनवर श्रीकृष्णाच्या बाल्यावस्थेतील भूमिका एका चिमुकल्या मुलीने साकारली होती. धृति भाटीया असे या चिमुकलीचे नाव आहे.

आता छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा महाभारत सुरु होत आहे. या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका सौरभ राज जैन साकारणार आहे. सध्या सौरभ 'देवों के देव महादेव' या मालिकेत भगवान विष्णूच्या भूमिकेत दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा काळानुरुप छोट्या पडद्यावर बदलत गेलेल्या श्रीकृष्णाचे रुप...