आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Deepika Singh Aka Sandhya And Rohit Raj Goyal\'s Wedding

आज बोहल्यावर चढणार दीपिका, रोहितसोबत अडकणार लग्नबेडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंह आणि 'दिया और बाती हम' शोचे दिग्दर्शक रोहित राज गोयल आज (2 मे) लग्नगाठीत अडकणार आहेत. 30 एप्रिल रोजी मुंबईत त्यांच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'दीया और बाती हम' या मालिकेतील जवळपास सर्वच स्टारकास्ट हजर होती. दीपिका आणि राजला शुभेच्छा देण्यासाठी नीलू बाघेला (भाभो), कनिका माहेश्वरी (मीनाक्षी), अरुण लोखंडे, नील भट्टसह अन्य क्रू मेंबर्स पोहोचले होते. सर्वांनी या कार्यक्रमात ठुमके लावले.
दीपिकाचे खासगी आयुष्य...
24 वर्षीय दीपिकाचा जन्म 26 जुलै 1989 रोजी दिल्लीत झाला होता. पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीतून बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये दीपिकाने मास्टर डिग्री (MBA) मिळवली. मात्र करिअरच्या रुपात तिने अभिनय क्षेत्राची निवड केली. 'दीया और बाती हम' ही दीपिकाच्या करिअरमधील पहिलीच मालिका आहे. 2011मध्ये ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. तेव्हापासून सुरु झालेला मालिकेचा हा प्रवास आजही सुरु आहे. शिवाय मालिकेची लोकप्रियतासुद्धा कायम आहे. दीपिकाच्या कुटुंबीयांनी दिग्दर्शक रोहित राज गोयलला तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात पाहिले होते. तेथेच त्याला पसंतही केले होते. रोहितच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.
रोहित आणि दीपिका यांच्यातील ट्युनिंग बघता त्यांचे वैवाहिक आयुष्य यशस्वी राहिल. टीव्ही इंडस्ट्रीतील असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी लव्ह मॅरेज केले आणि ते हॅपी मॅरिड लाइफ जगत आहेत. इंडस्ट्रीत त्यांना यशस्वी कपल म्हणून ओळखले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या कपल्सविषयी...