आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Deepika Singh Will Marry Her Show Director

‘दीया और बाती’मधील संध्या लवकरच चढणार बोहल्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दीया और बाती’मधील संध्या अर्थातच अभिनेत्री दीपिका सिंह लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक रोहित राय गोयलसह दीपिका बोहल्यावर चढणार आहे. दीपिकाने याविषयी सांगितले, की येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत ती रोहितसह लग्न करणार आहे. लव्ह कम अरेंज मॅरेज असल्याचे दीपिकाने यावेळी स्पष्ट केले. मालिकेच्या सेटवरच या दोघांचे सूत जुळले.
दीपिका आणि रोहित दोघेही मुळचे दिल्लीचे आहेत. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदील दिला आहे. दीपिका सांगते, ''माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात आईवडिलांनी रोहितला पाहिले होते. तेथेच त्यांनी त्याला पसंत केले. लवकरच रोहितच्या कुटुंबीयांनीसुद्धा मलादेखील पसंत केले आणि आमच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले.''
रोहितसोबतच्या आपल्या नात्याविषयी दीपिका सांगते, की दीया और बाती माझी पहिली मालिका आहे. मी इंडस्ट्रीत नवीन असताना रोहितने मला योग्य मार्ग दाखवला. तो खूप हेल्पफूल आहे. लग्नानंतरही काम सुरु ठेवणार असल्याचे दीपिकाने सांगितले.
तसं पाहता टीव्ही इंडस्ट्रीत लव्ह कम अरेंज मॅरेज होण्याची ही पहिला घटना नाहीये. यापूर्वीही अनेक कलाकारांनी लव्ह कम अरेंज मॅरेज केले आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणकोणत्या
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या टीव्ही इंडस्ट्रीतील लव्ह मॅरेजेसविषयी..