आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदाकिनी आणि झीनत अमानच्या लूकमध्ये दिसणार ही TV अॅक्ट्रेस, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म 'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनी, 'कृना'मधील दीपशिखाचा लूक आणि 'सत्यम शिवम सुंदरम'मधील झीनत अमान - Divya Marathi
फिल्म 'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनी, 'कृना'मधील दीपशिखाचा लूक आणि 'सत्यम शिवम सुंदरम'मधील झीनत अमान
 
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टंट राहिलेली दीपशिखा नागपालचे काही दिवसांपूर्वीच नव-यासोबत पॅचअप झाले आहे. खासगी आयुष्यातील ताणतणाव संपल्यानंतर आता दीपशिखा कामावर परतली आहे. सध्या ती आगामी 'कृना' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पनवेलमध्ये सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरु असून दीपशिखाने शूटिंग सेटवरील तिच्या लूकचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमधील तिची साडी स्टाइल 'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनी आणि 'सत्यम शिवम सुंदरम'मधील झीनत अमानच्या लूकशी साधर्म्य साधणारी आहे. 
 
2016 मध्ये दीपशिखाने नव-यावर लावला होता मारहाण केल्याचा आरोप...
मार्च, 2016 मध्ये दीपशिखाने पती केशव अरोरावर तिला मारहाण केल्याचा आरोप लावला होता. इतकेच नाही तर तिने घटस्फोटाचाही निर्णय घेतला होता. मात्र या भांडणाच्या दहा महिन्यांनंतर दीपशिखा आणि केशव पुन्हा एकत्र आले आहेत. दीपशिखाने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांचा एक फोटोसुद्धा शेअर केला होता. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, दीपशिखाचे सिनेमातील आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...