आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Kavita Laad Exit Form Char Divas Sasuche Marathi Serial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चार दिवस...' ला कविताचा रामराम !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कविता लाड-मेढेकर 'चार दिवस सासुचे' या मालिकेला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत गेल्या अकरा वर्षापासून कविता काम करत आहे. मालिकेत इतके वर्षे काम केल्यानंतर अचानक कविताने या मालिकेला रामराम ठोकण्याचा निर्णय का घेतला ? असे नेमके घडले तरी काय ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडणे स्वाभाविकच आहे.

'चार दिवस सासुचे' या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अनुराधा का दिसणार नाही याचे कारण आम्ही तुम्हाला सांगतो. 'चार दिवस सासुचे' या मालिकेच्या निर्मात्यांमुळे कवितावर हा निर्णय घेण्याची पाळी आली आहे. कविता सध्या 'चार दिवस सासुचे' या मालिकेबरोबर झी मराठी वाहिनीवरील 'उंच माझा झोका' या मालिकेतही झळकत आहे. त्यामुळे दुसरी मालिका करायची असेल तर पहिली मालिका सोडावी लागेल, असा फतवा 'चार दिवस सासुचे' या मालिकेच्या निर्मात्यांनी काढला आहे. रात्री आठच्या स्लॉटची मालिका का स्विकारली असा प्रश्नही तिला विचारला जाऊ लागला. शिवाय 'चार दिवस सासुचे' या मालिकेच्या तीन हजाराव्या भागातूनही कविताला रितसर वगळण्यात आले. आता मालिकेत आराधना माहेरी गेल्याचे दाखवण्यात येत आहे. निर्मात्यांकडून अशी सावत्रपणाची वागणूक मिळत असल्यामुळे अखेर कविताने मालिकेतूनच काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.
'पुन्हा 'बिग बॉस'सारख्या पागलखान्यात मी जाणार नाही'
'बिग बॉस'नंतर कधीच भारतात परतायचे नव्हते सनीला
‘अटकेचे दु:ख नाही, आनंद बिग बींना पाहिल्याचा’