आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेसाठी या अभिनेत्रीने बदलला लूक, कात्री न लावता केस केले लहान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'दिल की बातें दिल ही जानें' या छोट्या पडद्यावरील मालिकेत दिशा हे पात्र साकारणा-या अभिनेत्रीचे नाव आहे महिमा मकवाना. या मालिकेत नवीन हेअरस्टाइलमध्ये महिमा अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र या भूमिकेसाठी महिमा आपले लांब केसांची तिलांजली देईल, असा विचार कुणी केला असेल का?
याविषयी महिमा मकवाना सांगते, ''दिशाची स्टाइल मला आवडते. मात्र सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या शॉर्ट हेअरचे सत्य सांगते. माझ्या अनेक चाहत्यांना असं वाटतं, की या भूमिकेसाठी मी माझे केस लहान केले. मात्र हे सत्य नाहीये. मी माझे लांब केस मुळीच कापलेले नाहीत. मला माझे लांब केस खूप आवडतात. त्यामुळे ख-या केसांसोबतच माझी नवीन हेअरस्टाइल तयार करण्यात आली आहे. या मालिकेत मी माझ्या वयापेक्षा लहान दिसतेय. यापूर्वी रचना हे पात्र साकारताना माझे वय थोडे मोठे दाखवण्यात आले होते. मात्र नवीन हेअरस्टाइलच्या मदतीने माझे वय कमी दिसत आहे. याशिवाय दिशाचे फुटवेअर्स एकसारखे नाहीयेत. ती दोन्ही पायांत वेगवेगळ्या कलरचे फुटवेअर वापरते. या सुंदर आणि कूल लूकवर माझे प्रेम आहे.''
5 ऑगस्ट 1999 रोजी मुंबईत जन्मलेल्या महिमा मकवानाने करिअरची सुरुवात अनेक मालिकांमध्ये छोटेखानी भूमिका साकारुन केली. तिला खरी ओळख 'सबारे सबके सपने...प्रीतों' या मालिकेमुळे प्राप्त झाली. या मालिकेत तिने सोनू हे पात्र साकारले होते. याशिवाय 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेत महिमाने साकारलेले रचना हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. आता 'दिल की बातें दिल ही जानें' या मालिकेत ती राम कपूरच्या मुलीची भूमिका साकारत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, महिमा मकवानाचे लांब केस कसे झाले लहान...