आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अभिनेत्रीने एका माणसाला मारली कानाखाली, सांगितेल नेमके काय घडले..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेत्री पंखुडी अवस्थी सध्या स्टार प्लसवरील 'क्या कसूर है अमला का' या मालिकेत बलात्कार पीडितेची भूमिका करत आहे. मुळची लखनऊची असलेल्या् अभिनेत्रीने आमच्या प्रतिनीधीशी नुकत्याच मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल माहिती दिली. 
 
जेव्हा मार्केटमध्ये एका माणसाने मांडीवर ठेवला हात..
मागील काही दिवसात पंखुडी एका माणसाला कानाखाली मारल्याने चर्चेत आली होती. तिने सांगितले की, ती घटना बंगळुरुची आहे. मी माझ्या फ्रेंड्ससोबत फिरत होती. मी शॉर्ट स्कर्ट घातला होता. तेव्हा एक माणूस आला आणि त्याने माझ्या मांड्यावर हात ठेवला. तेव्हा मी त्याच्या कानाखाली लावली. ही पहिली घटना नाही. याअगोदर दिल्लीत असताना कॉलेजात जाताना असे अनेक प्रसंग यायचे पण लहान असल्याने तेव्हा काय करावे हे सुचायचे नाही, पण आता तशी गोष्ट नाही. 
 
नुकतेच गौतम रोडेच्या घरात शिफ्ट झाल्याने चर्चेत आहे पंखुडी..
अभिनेत्री पंखुडी लवकरच गौतम रोडेबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. ती त्यामुळे त्याच्या घरात शिफ्ट झाली आहे असेही समजते. यावर विचारले असता ती म्हणते, "लोक काहीही म्हणतात. मला शूटिंगला जाण्यासाठी रोज जास्त वेळ प्रवास करावा लागायचा. तो टाळण्यासाठी मी कांदीवलीला शिफ्ट झाली आहे"
 
पुढच्या 5 स्लाईडवर पाहा, पंखुडीचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...