आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Rekha Comeback Film 'Super Nani' Released On This Diwali.

'कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर साजरा झाला एव्हरग्रीन रेखाचा बर्थ डे, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(पहिल्या छायाचित्रात डावीकडून, उपासना सिंह, रेखा, सुमोना चक्रवर्ती, अली असगर, सुनील ग्रोवह आणि किकू शारदा, दुस-या छायाचित्रात रेखा आणि कपिल शर्मा)

मुंबईः यावर्षी दीवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान स्टारर 'हॅपी न्यू इयर' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाला टक्कर देण्यासाठी एव्हरग्रीन रेखा थिएटरमध्ये अवतरणार आहेत. रेखा यांची प्रमुख भूमिका असलेला 'सुपर नानी' हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रेखा कपिल शर्माच्या गाजत असलेल्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर पोहोचल्या होत्या.

'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर रेखासोबत शर्मन जोशी आणि रणधीर कपूरसुद्धा पोहोचले. या तिघांनी कपिल शर्माच्या फॅमिलीसोबत भरपूर धमालमस्ती केली. यावेळी रेखा गोल्डन कलरच्या साडीत खूप सुंदर दिसल्या. कपिलच्या डॉली दादीने रेखा यांना शगुनची पप्पीसुद्धा दिली. तर दुसरीकडे कपिल रेखासोबत फ्लर्ट करताना दिसला.

विशेष म्हणजे येत्या 10 ऑक्टोबर रोजी रेखा यांचा वाढदिवस आहे. त्याचेच औचित्य साधत सेटवर रेखा यांचा जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. रेखा यांनी सेटवर केक कापला.

सुपर नानी हा सिनेमाची कथा रेखा यांच्यावर केंद्रित आहे. सिनेमात रेखा यांच्यासह रणधीर कपूर, शर्मन जोशी, श्वेता कुमार, अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. इंद्र कुमार या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर क्लिक झालेली रेखा आणि इतर सेलेब्सची खास छायाचित्रे...