आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स स्कँडलच्या प्रश्नावर भडकली ही अॅक्ट्रेस, सांगितले सध्या कोणाला करते डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - 2014 मध्ये सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली अॅक्ट्रेस श्वेता बसु प्रसाद 'चंद्र नंदिनी' मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. स्टार प्लसवरील या शोमध्ये श्वेता चंद्रगुप्त मौर्यची पत्नी चंद्र नंदिनीच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी फिल्ममेकर राहुल मित्तलसोबत डेटवर गेल्यानेही श्वेता चर्चेत होती. श्वेता सध्या लखनौमध्ये आहे. यावेळी तिने तिच्या लाइफमधील अनटोल्ड स्टोरी divyamarathi.com सोबत शेअर केली.
हैदराबादमधील सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती श्वेता
- हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे झालेल्या बहुचर्चित सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बसूचे नाव आले होते.
- 2014 मध्ये झालेल्या या सेक्स स्कँडलमध्ये पकडली गेल्यानंतर श्वेता दोन महिने रेस्क्यू होममध्ये होती.
- रेस्क्यू होममधील विदारक अनुभव घेऊन ती दोन महिन्यानंतर घरी परतली.
- हैदराबाद सेशन कोर्टातून श्वेताची निर्दोष मुक्तता झाली होती.
- तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिला चारित्र्यावर उडालेले शिंतोडे पुसताना बराच त्रास झाला.
- या रॅकेटमध्ये तिचा सहभाग नव्हता, हे तिला वारंवार सांगावे लागत होते.
'मकडी' चित्रपटाला मिळाला होता नॅशनल अवॉर्ड
- 2002 मध्ये श्वेता 'मकडी' या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे चर्चेत आली होती.
- या चित्रपटातील अॅक्टिंगसाठी श्वेताल सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
- 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इकबाल'मध्ये श्वेता झळकली होती. या चित्रटातील तिच्या अभिनयाचे कौतूक झाले होते. अनेक अवॉर्ड मिळाले.
- चित्रपटांसह श्वेताने 'कहानी घर-घर की' आणि 'करिश्मा का करिश्मा' सारख्या टीव्ही सीरियल केल्या आहेत.
- राम गोपाल वर्माच्या 'डरना जरुरी है' मध्येही ती रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यासोबतच काही तेलगु चित्रपटांतूनही श्वेताने काम केले आहे.
- श्वेताचे वडील अनुज प्रसाद झारखंडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत.
पुढील स्लाइडमध्ये श्वेताचा Exclusive Interview
बातम्या आणखी आहेत...