आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री या अभिनेत्रीवर चोरांनी केला हल्ला, मात्र घडले काहीतरी वेगळेच...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टीव्ही अभिनेत्री सृजिता डे)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री सृजिता डेला ढाब्यावर जेवणे जरा महागातच पडले आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर चोरांनी अभिनेत्री आणि तिची चुलत बहीण यांच्यावर हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट) घडल्याचे सांगितले जात आहे.
बातम्यांनुसार, सृजता आणि तिची चुलत बहीण डिनरसाठी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हदीसरजवळ असलेल्या एका ढाब्यावर गेल्या होत्या. दोघी डिनर करून जात असताना त्यांना चोरांनी घेरले.
याविषयी सृजिताला विचारल्यानंतर तिने तिने सांगितले, की रात्री 12.30 वाजेच्या आसपास आम्ही ऑटोरिक्क्षाने घरी जात होतो. तेव्हा अचानक आमच्या समोर एक कार येऊन उभा राहिली. कारमधून तीन लोक बाहेर आले आणि त्यांनी आमच्या ऑटोरिक्क्षा चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना विरोध केल्याने त्यांनी माझ्यासह चुलत बहिणीवरही हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामधील एकाने फोन हिसकावून घेतला. त्यातील दोघांनी माझ्यावर हल्ला केला. मी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील एकाला कानशिलात लगावली. परंतु ते माझा फोन घेऊन फरार झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा पोलिसांनी का नाही केली मदत आणि कोण आहे सृजता डे...