आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही इंडस्ट्रीच्या \'बा\' सुधा शिवपूरी यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुधा शिवपूरी)
मुंबई- टीव्ही इंडस्ट्रीच्या 'बा' अर्थातच सुधा शिवपूरी यांचे बुधवारी (20 मे) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर ओशीबारा येथे 2:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुधा यांनी 'क्योकी सास भी कभी बहू थी'मध्ये 'बा'ची भूमिका साकारली होती. तेव्हापासून त्यांना 'बा' म्हणून ओळखला जाऊ लागले.
14 जुलै 1937ला इंदोरमध्ये जन्मलेल्या सुधा शिवपूरी यांनी टीव्ही मालिकांशिवाय अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले. 1977मध्ये प्रदर्शित झालेला बसु चॅटर्जी यांचा 'स्वामी' हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता.
अशाप्रकारे त्यांचे फिल्म करिअर सुरु झाले, त्यानंतर त्यांनी 'इन्साफ का तराजू', 'सावन को आने दो', 'विधाता', 'पिंजर' आणि 'माया मेमसाब' अशा अनेक अविस्मरणीय सिनेमांत काम केले.