Home »TV Guide» Actress Ulka Gupta Opens Up About Dark Side Of Glamour Industry

'झांसी की रानी' फेम अॅक्ट्रेसने व्यक्त केले दुःख, सांगितले का सोडावी लागली TV इंडस्ट्री

किरण जैन | Mar 16, 2017, 14:17 PM IST

मुंबईः 'झांसी की रानी' या मालिकेत मनु (लक्ष्मीबाई) च्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री उल्का गुप्ताला वयाच्या सातव्या वर्षी वर्णभेदाला सामोरे जावे लागले होते. याच कारणामुळे तिला बराच संघर्ष करावा लागला. त्यावेळी तिची 'रेशम डंक' नावाची मालिका सुरु होती. पण टीआरपी कमी असल्याने सहा महिन्यांतच मालिका डबाबंद झाली होती. सध्या उल्का दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत आहे. उल्काने divyamarathi.com सोबत केलेल्या एक्सक्लूसिव्ह बातचीतमध्ये टीव्ही ते साऊथ इंडियन इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास शेअर केला. उल्का आता 19 वर्षांची आहे. तिच्या मते, आजही अनेक गोष्टी बदलेल्या नाहीत.
निर्मात्यांना हवी असते अप मार्केट गर्ल...
उल्काने मुलाखतीत सांगितले, "मला बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे. पण फार कमी वयातच मला इंडस्ट्रीतील डार्क साइड फेस करावी लागली. 'रेशम डंक'च्या रॅपअपनंतर माझे पापा मला दररोज ऑडीशनसाठी घेऊन जायचे आणि प्रत्येक वेळी निराशा माझ्या पदरी पडायची. कारण निर्मात्यांना गोरी मुलगी हवी असायची. निर्मात्यांच्या मते, गोरी मुलगी ही अप मार्केट गर्ल असते. सावळ्या रंगामुळे मला नेहमी रिजेक्ट केले जायचे. इतकेच नाही तर माझ्या सावळ्या रंगामुळे मला 'सात फेरे' या मालिकेत सलोनीच्या मुलीची भूमिका मिळाली होती. माझ्या कास्टिंग एजेंटकडे ज्या रिक्वायरमेंट्स येतात, त्यामध्ये स्पष्ट लिहिले असते, की त्यांना गोरी मुलगीच हवीये. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मी आता अशा ऑडीशनला जाणेच बंद केले आहे. गोरे असण्याने कुणी अपमार्केट दिसत नाही. माझ्या सावळ्या रंगापेक्षा लोकांनी माझ्यातील टॅलेंट बघायला हवं."

'सात फेरे'नंतर उल्काला 'झांसी की रानी' मालिकेत मनुची भूमिका मिळाली. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. काही महिन्यांच्या लीपनंतर उल्काच्या जागी कृतिका सेंगरची वर्णी या भूमिकेसाठी लागली. या मालिकेच्या वर्षभरानंतर उल्का 'खेलती है जिंदगी आंख मिचोली' या मालिकेत झळकली. यामध्ये तिने गौतमी गाडगीळच्या मुलीची भूमिका वठवली होती. यावेळीसुद्धा तिला इंडस्ट्रीतील निगेटिव्ह साइड फेस करावी लागली होती.
उल्का पुढे सांगते, "वयाच्या 15 व्या वर्षी मी सेटवर टॅन्ट्रम्स दाखवले असतील, यावर तुमचा विश्वास बसेल का? हे वय खेळण्याचे आणि काम एन्जॉय करायचे असते. पण मी वादात आणि पॉलिटिक्समध्ये पुर्णपणे अडकली होती. जेव्हा मी 'खेलती है जिंदगी आंख मिचोली' ही मालिका करत होते, तेव्हा माझ्यावर अनप्रोफेशनल असल्याचा आरोप झाला. विश्वास ठेवा, या निगेटिव्ह रिपोर्ट्सचा माझ्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला. वाढत्या वयात मला अशा नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. याच कारणामुळे मी डेली सोपमध्ये काम करणे सोडून दिले. मी नॉर्मल वातावरणात जगू इच्छिते. आता माझे संपूर्ण लक्ष मोठ्या पडद्यावर आहे."

उल्का 'रुद्रमादेवी' या तामिळ सिनेमात झळकली आहे. याशिवाय तिचा एक हिंदी आणि एक मराठी सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात हे सिनेमे रिलीज होणार आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, उल्का गुप्ताचे फोटोज...

Next Article

Recommended