आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांत ही ग्लॅमरस अभिनेत्री बनली \'अम्मा\', जाणून घ्या कसा बदलला LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ: रुपेरी पडद्यावर अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारणारी उर्वशी शर्मा आता टीव्हीवर पदार्पण करत आहे. ती 'अम्मा' या टीव्ही शोच्या प्रमोशनसाठीर लखनौमध्ये आली होती. कधीकाळी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री असलेली उर्वशीचा लूक लग्नानंतर पूर्णपणे बदलून गेला. तिने वजन वाढवल्याच्या विषयीवर गप्पा मारल्या.
एकेकाळी होते 56 किलो वजन, 4 वर्षांत झाली 86 किलोची...
- उर्वशी परफेक्ट फिगरसाठी ओळखली जात होती. मात्र आता ती लठ्ठ झाली आहे.
- याविषयी तिने सांगितले, 'प्रेग्नेंसीपूर्वी माझे वजन 56 किलो होते. मुलगी झाल्यानंतर 86 किलो वजन झाले. तेव्हापासून वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेय परंतु काहीच होत नाहीये.'
- 'इतर कसे वजन कमी करतात काय माहित. अनेकांनी सांगितले, की शिल्पा शेट्टीकडून टिप्स घे. तिलासुध्दा वजन कमी करायचे 3-4 वर्षे लागले होते. इतक्या दिवसांत मीसुद्धा सडपातळ होईल.' उर्वशीने हसून उत्तर दिले.
- उर्वशीने जानेवारी 2014मध्ये मुलगी समायराला जन्म दिला.
अडीच वर्षे राहिली लिव्ह-इनमध्ये...
- उर्वशीने वयाच्या 27व्या वर्षी लग्न केले. तिने लग्नापूर्वीच्या लिव्ह-इन-रिलेशनशिपविषयी संवाद साधला.
- तिने सांगितले, 'मी आणि सचिन अडीच वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलो. आम्ही एकमेकांना समजून घेतले. सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी मला कोणत्याच गोष्टीसाठी दबाव टाकला नाही.'
- माझ्या पतीने मला खूप पाठिंबा दिला आहे. त्याच्या कुटुंबात सर्व शाकाहारी होते. परंतु मी नॉन-व्हेजची शौकीन होते. यावर कधीच वाद झाला नाही.
- अनेक कपल्स लिव्ह-इनमध्ये राहूनसुध्दा लग्न करू शकत नाहीत. परंतु आमचे नाते लग्नापर्यंत पोहोचले आणि आम्ही खूप आनंदी आहोत.
प्रेमासाठी करिअरचा केला त्याग...
- उर्वशीने करिअरमध्ये लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
- याविषयी तिने सांगितले, 'मी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला अनेक सिनेमांचे ऑफर आले होते. परंतु मी करिअरसाठी फॅमिलीला सोडणारी व्यक्ती नाहीये.'
- 'त्यानेळी मी सचिनला डेट करत होते. माझ्यासाठी आमचे नाते महत्वाचे होते. म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला. मी 3-4 सिनेमे केले, लग्न केले आणि चांगले आयुष्य घालवतेय. हेच महत्वाचे आहे.'
पतीने सांगितले, तेव्हाच केला शो...
- टीव्ही डेब्यूविषयी उर्वशी सांगते, 'माझी मुलगी आता अडीच वर्षांची झाली आहे. कधी ना कधी सुरुवात करायचीच होती. मी थिएटर करण्याचा निर्णय घेतला.'
- 'मी 'सेल्फी' नावाच्या नाटकात काम करत होते. तेव्हा 'अम्मा'चा निर्माता फरहानने मला पाहिले आणि कास्ट केले.'
- 'मी टीव्ही शोसाठी स्वत:ला तयार करत होते. तेव्हा माझ्या डोक्यात सासू-सून आणि नागिनच्या भूमिका येत होत्या.'
- 'फरहान म्हणाला हैदराबादला शूटिंग होईल. मी म्हणाले, फॅमिलीला सोडून मी कुठेच राहू शकणार नाही.'
- 'नंतर फरहानने स्क्रिप्ट माझ्या पतीला ऐकवली. त्याला स्क्रिप्ट आवडली. सचिनने सांगितले, माझी पत्नी काम करेल आणि प्रवास सुरु झाला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मागील 4 वर्षांत किती बदलला उर्वशीचा लूक...
बातम्या आणखी आहेत...