आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरचा आदित्य \'सूर्यपूत्र कर्ण\'च्या भूमिकेत, पात्रासाठी 8 किलो वजन केले कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर झळकणारा आदित्य रेडीज 'सूर्यपूत्र कर्ण' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, आदित्यने या भूमिकेसाठी तब्बल आठ किले वजन कमी केले आहे. याविषयी आदित्य सांगतो, की आठ किलो वजन कमी करणे खरंच त्रासदायक होते, मात्र प्रेक्षकांच्या प्रेमामुळे सर्व त्रास विसरण्यास मदत होते.
आदित्य पुढे म्हणाला, 'मी मागील 'बंधन' या मालिकत ३५ वर्षीय वडीलांची भूमिका साकारली होती. म्हणून मला 'सूर्यपूत्र कर्ण'मध्ये तरुण दिसण्यासाठी थोडे वजन कमी करावे लागले. मालिकांतील झलकांसाठी मी तीन दिवसांत तीन किलो वजन घटवले. अगदी कमी वेळेत वजन कमी करणे जोखमीचे आहे, परंतु लोक तुम्हाला पाहतात, तेव्हा सर्व कष्टाचे फळ मिळते.
वजन कमी करण्यासाठी कधी-कधी मोजकेच जेवण करत होतो, तसेच कधी-कधी एक अंडा आणि ज्यूसवर संपूर्ण दिवस राहत होतो.'
आदित्यला कायापलट करणे आवडते, तो सांगतो, 'मी प्रत्येक भूमिकेचा आनंद लुटतो. मला वेगवेगळे लूक करण्यास आवडतात. मी माझ्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतण्याचा प्रयत्न करतो.'
तसे पाहता, आदित्य मूळचा कोल्हापूरचा आहे. नागाळा पार्कात राहणा-या आदित्यला कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाच वेड होत. सेंट झेवियर्स शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदित्यने पुण्यामध्ये बी.कॉममधून पदवी घेतली. आदित्य अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ लागला नाही. 'ना आना इस देस लाडो' मालिकेसाठी त्याने ऑडिशन दिले आणि 'राघव'च्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. तो केवळ तीन मालिकांमधून घराघरात पोहोचला. आदित्यने 'जबरदस्त' या मराठी सिनेमांतही काम केले आहे.
शूटिंगमधून वेळ मिळाल्यास आदित्य कोल्हापूरला वेळ घालवण्यासाठी जातो. आदित्यची आई भावना रेडीज नागाळा पार्कात बुटीक चालवतात, तर वडील बिपिन व्यावसायिक आहेत.
आदित्यची मुख्य भूमिका असलेली 'सूर्यपूत्र कर्ण' मालिका सोनी वाहिनीवर 29 जूनपासून प्रसारित होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आदित्यचे निवडक फोटो...
फोटो- इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून घेण्यात आले आहेत.