आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या डोक्यात खरंच हवा गेलीय का? शाहरूखला परतवण्यासाठी आजारपणाचे नाटक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान आणि कपिल शर्मा. - Divya Marathi
शाहरुख खान आणि कपिल शर्मा.
मुंबई - शनिवारी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावे (शुक्रवारी) लागले होते. कपिल अचानक आजारी पडल्याने शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा 'द कपिल शर्मा शो' च्या सेटवरून शुटिंग न करताच परतले होते. पण समोर येत असलेल्या माहितीनुसार कपिलला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. उलट तो त्याच्या अपकमिंग 'फिरंगी' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. 

काय म्हटले हॉस्पिटल मॅनेजमेंटने.. 
- न्यूज वेबसाइट स्पॉटब्वॉयने केलेल्या दाव्यानुसार कोकिलाबेन रुग्णालयाने शुक्रवारी कपिल उपचारासाठी आलाच नव्हता असे स्पष्ट केले आहे. 
- त्याचदरम्यान सुत्रांनी सांगितले की, कपिल लोखंडवालामधून मीरा रोडच्या जनरल स्टुडियोकडे निघाला आहे. त्याठिकाणी त्याच्या 'फिरंगी' चित्रपटाची शुटिंग सुरू होती. 

स्टुडिओबाहेर दिसली कपिलची कार.. 
- वेबसाईटने त्यांच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, त्यांनी स्टूडियोमध्ये कपिलला शूटसाठी तयार होतानाही पाहिले आहे. 
- एवढेच नाही, तर एका स्टुडियोबाहेर कपिलची कारही उभी होती. 
- कपिल कोकिलाबेन हॉस्पिटलऐवजी दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला असाही विचार केला तरी, दुसऱ्याच दिवशी शूटला जायला त्याच्याकडे एनर्जी कुठून आली असा प्रश्न उभा राहतो. 
- कपिलचा सहकारी किकू शारदाने मात्र सांगितले होते की, हॉस्पिटलने कपिलला अॅडमिट व्हायला सांगितले आहे. 

किकू शारदाचे स्टेटमेंट.. 
- एका वेबसाईटबरोबर बोलताना किकू म्हणाला होता की, शाहरुख खान शुक्रवारी फिल्मसिटीमध्ये स्पेशल एपिसोड शूट करणार होता. 
- शाहरुख सेटवर आला त्यावेळी कपिल हॉस्पिटलला गेला होता. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता. तो अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे आणि कुटुंबातील लोक त्याच्या बरोबर आहेत, असेही किकूने सांगितले होते. 
- आता आमचे रेग्युलर शूट 11 आणि 13 जुलैला होईल. पण त्यावेळी कोणता फिल्मस्टार येईल, हे माहिती नाही असे किकूने सांगितले. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, शाहरुखला यापूर्वीही दोन तास वाट पाहायला लावली आहे कपिलने.. 

 
बातम्या आणखी आहेत...