आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Karishma, Gautam Picks A Fight With Soni In Bigg Boss

Bigg Bossमध्ये रागीट गौतम घेणार सोनाशी पंगा, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Bigg Bossच्या घरात गौतम गुलाटी, उपेन पटेल आणि सोना सिंह)
मुंबई: 'बिग बॉस'मध्ये दुस-या आठवड्यात गौतम गुलाटी आणि करिश्मा तन्ना यांच्यात हायजॅक टास्कदरम्यान तू-तू, मे-मे झाली. एवढेच काय, गौतमने करिश्माला शिवीगाळ केली होती, तेव्हा हाऊसमेट्सने अघोषितरित्या दूरावा निर्माण केला होता. आता बातमी आहे, की गौतम, सोना सिंहशी वाद घातलाना दिसला.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, गौतम गुलाटी, करिश्मानंतर आता सोनी सिंहसोबतसुध्दा वाद घालताना दिसला. हा सर्व प्रकार आय स्लब चॅलेंजदरम्यान सुरु होणार आहे. गौतम सोना सिंहचा को-कन्टेस्टंट पुनीत इस्सरला मदत केल्यामुळे सोना चिडलेली दिसेल. गैरसमजातून 'बिग बॉस'च्या घरातील वातावरण तणावात बदलेल.
सूत्रांनी असेही सांगितले, की या टास्कदरम्यान गौतम पाणी उकळताना दिसणार आहे. हे पाणी अंघोळीसाठी उकळत असल्याचे गौतम सांगणार आहे. पण ते उकळलेले पाणी गौतम अंघोळीसाठी नव्हे तर बर्फ वितळवण्यासाठी करणार आहे. त्यादरम्यान हाऊसमेस्ट्समध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि सोनी गौतमला खोटारडा असल्याचा करार देते. त्यानंतर घरात नवीन नाटक सुरु होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही निवडक छायाचित्रे...