आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखनंतर आता सलमान होस्ट करणार किड्स शो !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातले युद्ध काही संपण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. अलीकडेच बातमी आली आहे, शाहरुख खान पुन्हा एकदा 'क्या आप पाचंवी पास से तेज है' हा शो होस्ट करताना दिसणार आहे.
तर दुसरीकडे शाहरुखला टक्कर देण्यासाठी म्हणे सलमानसुद्धा मैदानात उतरला आहे. सलमान लवकरच एक किड्स शो होस्ट करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप सलमानच्या संदर्भातील ही बातमी खरी आहे की खोटी हे स्पष्ट झालेले नाही. पण सलमानच्या संदर्भातील ही बातमी खरी ठरली तर पुन्हा एकदा सलमान आणि शाहरुख यांच्यातील चढाओढ प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की.