आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐकलं का.. शिल्पा शिंदेनंतर आता शुभांगी अत्रे ठोकणार मालिकेला रामराम, हे आहे त्यामागचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील गाजत असलेली ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे या मालिकेला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. मालिकेच्या टीमने आता तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधायला सुरूवात केलेय. यापूर्वी शिल्पा शिंदे हिने अंगुरी भाभीची भूमिका साकारली होती. मात्र, निर्मात्यांसोबत वाद झाल्यानंतर ती या मालिकेतून बाहेर पडली होती.  शुभांगी अत्रे हिचे ही मालिका सोडण्यामागचे कारण वेगळे आहे. तिचा निर्मात्यांशी वाद झालेला नाही. 


हे आहे कारण... 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी अत्रे राजकारणात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी ती एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाली होती. त्यावेळी शुभांगीला राजकीय क्षेत्रात काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी अजूनही याबाबत संभ्रमात असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर शुभांगी मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


शिल्पाने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी नवीन अभिनेत्रीला शोधणं निर्मात्यांसाठी कठीण काम होतं. शिल्पा शिंदेंने अंगुरी भाभी म्हणून प्रेक्षकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मालिकेचा टीआरपीसुद्धा वधारला होता. प्रेक्षकांनीही शुभांगीला अंगुरी भाभीच्या रूपात स्वीकारले होते. मात्र, आता शुभांगीही मालिका सोडून जात असल्याने निर्मात्यांसमोर पुन्हा नवा चेहरा शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. आता कुठली अभिनेत्री अंगुरी भाभीच्या भूमिकेत झळकणार हे बघणं इंट्रेस्टिंग ठरणार हे नक्की.  

 

पुढे बघा, अंगुरी भाभीच्या लूकमधील शुभांगीची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...