आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After The Slap, Kejriwal Refuses To Shoot For Comedy Nights With Kapil

कपिलच्या शोमध्ये जाण्यास केजरीवालांचा नकार, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी या पक्षाने नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचा 'आप' पक्ष भारतीय राजकारणात लोकप्रियतेच्या बाबतीत टॉपमध्ये आहे. दिल्ली निवडणूकीनंतर केजरीवाल यांच्या चांगल्या कामगिरीमुळे विनोदवीर कपिल शर्माने त्यांना आपल्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये आमंत्रित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. केजरीवाल यांनीसुध्दा शोमध्ये सहभागी होण्यास होकार दिला होता. परंतु आता ऐकिवात आहे, की केजरीवाल यांचा चेहरा सुजला असल्याने ते सध्या कपिलच्या शोमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीये.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'अरविंद केजरीवाल यांना कपिलने आपल्या शोमध्ये आमंत्रित केले होते आणि त्यांनीसुध्दा शोमध्ये येण्यास होकार दिला होता. केजरीवाल स्वत: कपिलचे मोठे चाहते आहेत. ते 9 एप्रिल रोजी कपिलच्या शोमध्ये शुटिंगमध्ये पोहोचणार होते. परंतु 8 एप्रिलला त्यांच्यासोबत झालेल्या घटनेमुळे त्यांनी या शोमध्ये येण्याचे टाळले आहे.'
8 एप्रिल रोजी एका ऑटो रिक्शा चालकाने दिल्ली सुल्तानपुरीमध्ये झालेल्या 'आप' पक्षाच्या रोड शोमध्ये केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे त्यांच्या चेह-यावर सुज दिसून येत आहे.
सुत्राच्या सांगण्यानुसार, चेह-यावर जास्त सुज असल्याने त्यांनी कपिलला कॉमेडी शोच्या शुटिंगमध्ये येण्यास नकार दिला. याविषयी केजरीवाल यांच्यासोबत मिटींसुध्दा झाली.
कानशिलात लगावल्यानंतर केजरीवाल यांचा चेहरा सुजल्याची काही छायाचित्रेसुध्दा समोर आली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा केजरीवाल यांच्या सुजलेल्या चेह-याची काही छायाचित्रे...