आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्ष केले स्ट्रगल, आता मुंबईत असे आहे या कॉमेडियनचे Dream Home

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एहसान कुरेशीचे ड्रॉइंग रूम. - Divya Marathi
एहसान कुरेशीचे ड्रॉइंग रूम.
मुंबई - एहसान कुरेशी हा सध्या भारताच्या आघाडीच्या कॉमेडियन्सपैकी एक ऐहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो पडद्यापासून दूर असल्याचे चित्र आहे. तो अंधेरीतील त्याच्या 2BHK घरात राहतो. आमच्याशी बोलताना एहसान यांनी सांगितले की, त्यांनी पहिले घर बरघाट (मध्य प्रदेश), दुसरे नागपूर (महाराष्ट्र) आणि तिसरे मुंबईत खरेदी केले होते.

देशासाठी फुटबॉल खेळायचे होते..
बरघाट, सिवनी (मध्य प्रदेश) मध्ये जन्मलेल्या एहसानने सांगितले की, त्यांनी MMA (मास्टर ऑफ मॅनेजमेंट अॅनालिटिक्स) केले आहे. मला फुटबॉल प्लेयर बनून देशासाठी खेळायचे होते, पण शिकण्यासाठी पैसे नव्हते असे एहसान कुरेशी सांगतात. ते हॉकी आणि जिम्नॅस्टीकही खेळायचे पण खेळात करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

6 भावंडांमध्ये एकटा मुलगा
एहसान सांगतात की, माझ्या वडिलांचा मृत्यू फार लवकर झाला होता. मी सहा भावंडांमध्ये एकटा मुलगा होतो. मला बहिणींनी लहानाचे मोठे केले. माझ्यात लोकांना हसवण्याची कला होते. स्पोर्ट्स टीममध्येही मी सगळ्यांना हसवायचो. मी या कलेचा वापर पैसे कमावण्यासाठी केला. हळू हळू रोड शो, थिएटर शोमध्ये सहभागी होऊ लागलो. यादरम्यान मला अनेक प्रकारचे अॅवॉर्ड्स मिळाले. त्यावेळी कॉमेडी हा केवळ पैसा कमाण्यासाठी केली जायची. लोक त्याला गांभीर्याने घेत नव्हते.

स्वतःला सिद्ध करायला 20 वर्षे लागली
मी 1985 मध्ये सुरुवात केली होती. स्वतःला सिद्ध करायला 20 वर्षे लागली. या 20 वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या परिस्थितींचा सामना केला. एक काळ असाही होता जेव्हा शो साठी पैसैही दिले जात नव्हते. अनेकदा जायला पैसे नसल्याने मी जाईपर्यंत शो संपलेला असायचा. मी रडत घरी यायचो.

2005 मध्ये घडला बदल
2005 मध्ये ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजने माझे आयुष्यच पालटले. आमच्या सारख्या स्ट्रगलर्ससाठी हा अगदी योग्य प्लॅटफॉर्म होता. या शोमुळे मला पैसाही मिळाला आणि प्रसिद्धीही मिळाली. मी बरघाटमध्ये पहिले घर घेतले. त्यानंतर नागपूरमध्ये दुसरे आणि मुंबईत तिसरे घर घेतले. ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज’ मध्ये सहभागी झाल्यानंतर तीन वर्षातच मी अंधेरीसारख्या पॉश परिसरात घर घेतले.

जिमला जाणे आवडत नाही
एहसानने सांगितले की, त्याला जिमला जायला आवडत नाही. ते घरीच ट्रेडमिलवर व्यायाम करतात. तसेच इतर रोजचे व्यायामही करतात. लहानपणापासूनच योगा करत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसातून दोनदा सूर्य नमस्कार आणि शिर्षासन करणे हा रुटीनचा भाग असल्याचे ते सांगतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, एहसानच्या मुंबईतील घराचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...