आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: कपिलच्या शोमध्ये पोहोचली 'ए दिल है मुश्किल'ची टीम, बघा ऐश-रणबीर-अनुष्काची धमाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. सिनेमा वादात सापडला असला तरीही या सिनेमाची टीम सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ची संपूर्ण टीम नुकतीच विनेदवीर कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमामध्ये आली होती. अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर या कार्यक्रमामध्ये आले होते.
विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याच्या अफलातून टीमसोबत ऐश्वर्या-रणबीर-अनुष्का धमाल करताना दिसले. या सिनेमाच्या निमित्ताने पार पडलेल्या ‘द कपिल शर्मा शो’च्या या खास भागाचे प्रक्षेपण 22 किंवा 23 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा दिवाळीत 28 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये या सिनेमातील कलाकार आणि कार्यक्रमासाठी उपस्थित प्रेक्षक ‘इस साल की दिवाली होगी ऐ दिल है मुश्किलवाली’ असे म्हणताना दिसत आहेत.
करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान एक महत्त्वाची भूमिका साकारत असल्यामुळे सध्या या सिनेमाचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, द कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्काने केलेली धमाल खास छायाचित्रांमध्ये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...