(भूतान यात्रादरम्यान ऐश्वर्या सखूजा तिच्या फ्रेंडसह)
मुबई: टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा डिसेंबरमध्ये लग्गाठीत अडकणार अशा बातम्या समोर आल्या आहेत. परंतु त्यापूर्वी ती सिंगल लाइफचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. अलीकडेच, ती तिच्या फ्रेंड्ससह भूतानला गेली होता.
ऐकिवात आहे, की तिची इच्छा होती की फ्रेंड्स बॅचलर लाइफचा आनंद लुटावा. याविषयी अधिक जाऊन घेण्यासाठी ऐश्वर्याशी बातचीत केली असता, तिने सांगितले, 'हो मी अलीकडेच, भूतानची यात्रा करून आले आहे. या ट्रिपमध्ये माझ्यासह काही फ्रेंड्स होत्या. मी लवकरच टीव्हीवर पुनरागमन करत आहे. शिवाय माझे लग्नदेखील होणार आहे. त्यामुळे हा वेळ माझ्या फ्रेंड्ससह घालवणे मला योग्य वाटला.'
2010पासून 2012पर्यंत टीव्हीवर प्रसारित होणा-या 'सास बिन ससुराल' या मालिकेपासून लोक ऐश्वर्याला ओळखतात. याव्यतिरिक्त मागील महिन्यात ऑफ एअर झालेल्या 'मै न भूलूंगी' मालिकेतसुध्दा ती मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. यावर्षी डिसेंबर महिन्यात तिचे लग्न दिग्दर्शक रोहित नागसह होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भूतानला भटकंती करायला गेलेल्या ऐश्वर्याची छायाचित्रे...