आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अजय देवगनने कपिल शर्माला दिला सल्ला, म्हणाला-\'लग्न नको करू\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने टीव्ही होस्ट आणि कॉमेडिअन कपिल शर्माला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने टि्वटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यामध्ये तो म्हणतो, 'अरे कपिल... ऐकिवात आहे, की तू लग्न करत आहेस. चांगलय, पण मित्र होण्याच्या नात्याने एक सल्ला देतो, लग्न नको करूस.' मात्र अजयने या सल्ल्या मागील कारण स्पष्ट केले नाही.
मागील काही दिवसांपासून मीडियामध्ये कपिल शर्माच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. या चर्चेला कपिलला नवरदेवाच्या वेशभूषेतील एक फोटो लीक झाल्यने सुरुवात झाली होती. मात्र नंतर समोर आले, की हा फोटो कपिलच्या 'किस-किस से प्यार करू' या आगामी सिनेमातील एका सीनचा आहे. या सीनमध्ये एली अवराम आणि कपिल वधू-वराच्या लूकमध्ये दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपिल शर्माचे नवरदेवाच्या वेशभूषेतील फोटो, ज्यांनी एकवटली चर्चा...