आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नच बलिए 7\' ग्रॅण्ड फिनाले PHOTOS : प्रीतीसोबत सेल्फीच्या मूडमध्ये दिसला अजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नच बलिये 7 : प्रीती झिंटासोबत सेल्फी मूडमध्ये अजय देवगण, स्टेजवर मस्तीच्या मूडमध्ये चेतन भगत आणि मर्जी पेस्तोंजी आणि उजवीकडे होस्ट ऋत्विक धंजानीसोबत डान्स करताना श्रिया सरन - Divya Marathi
नच बलिये 7 : प्रीती झिंटासोबत सेल्फी मूडमध्ये अजय देवगण, स्टेजवर मस्तीच्या मूडमध्ये चेतन भगत आणि मर्जी पेस्तोंजी आणि उजवीकडे होस्ट ऋत्विक धंजानीसोबत डान्स करताना श्रिया सरन

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने रविवारी रंगलेल्या 'नच बलिये'च्या सातव्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेत आपली उपस्थिती लावली होती. येथे तो आपल्या आगामी 'दृश्यम' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री श्रिया सरनसुद्धा होती. अजय या मंचावर शोची जज आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटासोबत सेल्फी घेताना दिसला.
श्रिया सरन शोचा होस्ट ऋत्विक धंजानीसोबत थिरकताना दिसली. तर जज चेतन भगत आणि मर्जी पेस्तोंजी यांनीही या मंचावर ठुमके लावले. 'नच बलिये'च्या सातव्या पर्वात महाराष्ट्राची लेक आणि जावई अर्थातच अभिनेत्री अमृता खानविलकर-मल्होत्रा आणि हिमांशू मल्होत्रा विजेते ठरले.
करिश्मा तन्ना-उपेन पटेल, रश्मी देसाई-नंदीश संधू आणि अजीशा शाह-मयुरेश यांना मागे टाकत अमृता-हिमांशूने नच बलियेचा किताब आपल्या नावी केला.
नोटः अजय देवगण आणि श्रिया सरन स्टारर 'दृश्यम' हा सिनेमा निशिकांत कामत यांनी
दिग्दर्शित केला आहे. तब्बू आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 31 जुलै रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'नच बलिये 7'च्या ग्रॅण्ड फिनालेची निवडक छायाचित्रे...