आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgan, Kareena Kapoor Laugh Away On ‘Comedy Nights With Kapil’

\'शगुन की पप्पी\'साठी दादीने घेतला अजयसोबत पंगा, स्टार्स दिसले मस्तीच्या मूडमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अजय देवगणला 'शगुन की पप्पी' देताना 'कॉमेडी नाइट्स...'मधील दादी आणि बाजूला बसलेली करीना कपूर)
मुंबई: अजय देवगण आणि करीन कपूर खान त्यांच्या 'सिंघम रिटर्न्स' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी गुरुवारी (31 जुलै) कपिलच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये पोहोचले. येथे दोन्ही स्टारकास्टनी कॉमेडी नाइट्सच्या सदस्यांसोबत मस्ती करून प्रमोशनला अविस्मरणीय बनवले.
करीना शोदरम्यान काळ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट लूकमध्ये दिसली. तसेच अजय पांढ-या रंगाचा शर्ट आणि निळ्या जीन्सच्या गेटअपमध्ये दिसला. शोमध्ये कपिलच्या दादीने अजय देवगणला जबरदस्ती 'शगुन की पप्पी' देण्याचा प्रयत्न केला. तसेच किकू शारदाने अजयसह फाइट केली. कपिलसुध्दा शोमध्ये नेहमीप्रमाणे विविध जोक्समध्ये कॉमेडी करताना दिसला.
'सिंघम रिटर्न्स' हा 2011मध्ये आलेल्या 'सिंघम'चा सीक्वल आहे. 'सिंघम रिटर्न्स'सुध्दा भ्रष्टाचा-यांच्या विरोधात लढाई करणा-या बाजीराव सिंघम या पोलिस अधिका-याची कहानी रेखाटण्यात आली आहे. सिनेमात अनुपम खेर, 'CID' फेम दयानंद शेट्टी, शमीर धर्माधिकारी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 15 ऑगस्ट रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.
'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर पोहोचलेल्या करीना आणि अजय यांच्या मस्तीभ-या अंदाजाची छायाचित्रे पाहण्यासाठी सुरु करा...