(फाइल फोटो- श्रष्टी नय्यरसोबत रजत टोकस)
मुंबई- प्रसिध्द टीव्ही मालिका 'जोधा अकबर'च्या अकबर अर्थातच रजत टोकस लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. एक प्रसिध्द न्यूज वेबसाइटनुसार, रजत लवकरच
आपल्या कामातून 15 दिवसांची सुटी घेऊन लग्नाच्या तयारीत बिझी होणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, रजतचे लग्न 30 जानेवारी 2015मध्ये होणार आहे. त्याच्या वधूचे नाव श्रष्टी नय्यर आहे. मात्र रजतने किंवा त्याची भावी पत्नी श्रष्टीने लग्नाविषयी कोणतेही स्पष्टीकर दिलेले नाहीये. याचवर्षी एप्रिल महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.
रजत 2007पासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने पहिल्यांदाच ऐतिहासिक पार्श्वभूमिवर प्रसारित होणा-या 'धरती का वीर योध्दा पृथ्वीराज चौहान'मध्ये संधी मिळाली होती. त्याच्या या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. सध्या तो झीटीव्हीच्या 'जोधा अकबर' मालिकेत अकबरची भूमिका वठवत आहेत. तसेच, त्याची गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी श्रष्टी '
बिग बॉस'ची माजी
स्पर्धक आणि आर्य बब्बरची प्रेयसी होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रष्टी नय्यर आणि अकबर अर्थातच रजत टोकसची छायाचित्रे...