(एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगाच्या सेटवर स्टंट करताना अक्षय कुमार, कृष्णा अभिषेक आणि मोना सिंह)
मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार सध्या 'एंटरटेन्मेंट' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त तो 'एंटरटेन्मेंट के लिए...'च्या सेटवर पोहोचला होता. त्याच्यासह सिनेमाची अभिनेत्री तमन्ना भाटियासुध्दा दिसली. यादरम्यान अक्षय कुमारने केवळ सिनेमा प्रमोशनच नव्हे तर स्पर्धकांसह धमालही केली.
त्याने शोचा स्पर्धक रवि आणि रमेश यांच्यासह फायर स्टंट करून प्रेक्षकांसह परिक्षकांचेही मनोरंजन केले. याव्यतिरिक्त अनु मलिकसह त्याने एका गाण्याची एक लाइन गाऊन उपस्थित लोकांचे मन जिंकले.
साजिद-फरहाद यांचा पहिलाच दिग्दर्शित 'एंटरटेन्मेंट' सिनेमा 8 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. सिनेमात अक्षय कुमार आणि तमन्ना भटियाशिवाय मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, सोनू सुद आणि प्रकाश राज यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा रमेश तौराणी आणि जयंतलाल गडा यांनी निर्मित केला आहे.
'एंटरटेन्मेंट के लिए...'च्या सेटवर अक्षयने केलेले स्टंट आणि धमाल पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...