आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजच्या अनेक वर्षांनी पहिल्यांदाच TV वर दाखवले जाणार आहेत अक्षय कुमारचे हे 4 चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः येत्या 9 सप्टेंबर रोजी अभिनेता अक्षय कुमार वयाची 50 वर्षे पूर्ण करणार आहे. यानिमित्ताने झी सिनेमाने अक्षयचे आजवर टीव्हीवर कधीही प्रसारित न झालेले काही खास चित्रपट दाखवण्याची तयारी केली आहे. अक्षयचे हे सर्व सिनेमे सुनील दर्शन यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेले आहेत. पण आजवर कधीही ते टीव्हीवर प्रसारित झाले नाहीत. कारण सुनील दर्शन यांनी या चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क विकले नव्हते. पण एवढ्या वर्षांनी आता टीव्हीवर हे चित्रपट प्रसारित होत असल्याने निश्चितच चॅनल आणि सुनील दर्शन यांच्यात एक मोठा करार झाला असावा. 

सुनील दर्शन यांनी आजवर का विकले नव्हते सॅटेलाइट हक्क... 
- 2010 साली दिलेल्या एका मुलाखतीत सुनील म्हणाले होते, "माझा हा निर्णय किती चुक किंवा बरोबर आहे, हे मला ठाऊक नाही. पण माझ्या मते, सिनेमा हा फक्त थिएटर्ससाठीच असतो, टीव्हीसाठी नाही."
- 1988 साली सुनील दर्शन यांनी पहिल्या सिनेमाची निर्मिती केली होती. त्या सिनेमा नाव होते 'इंतकाम'. यामध्ये सनी देओल आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
- 29 वर्षांच्या करिअरमध्ये सुनील यांनी 12 सिनेमांची निर्मिती केली आहे. यापैकी पाच सिनेमे त्यांनी अक्षय कुमारसोबत केले.
 
एक नजर टाकुया, पहिल्यांदाच टीव्हीवर प्रसारित केल्या जाणा-या अक्षय कुमारच्या चित्रपटांवर...  
 
1. जानवर (1999)
को-स्टार्स : करिश्मा कपूर, आशुतोष राणा, मोहनीश बहल
डायरेक्टर : सुनील दर्शन
कधी होणार आहे टीव्हीवर प्रसारित : 3 सप्टेंबर  
वेळ : रात्री 9 वाजता 
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, टीव्हीवर पहिल्यांदाच दाखवण्यात येणा-या अक्षयच्या आणखी तीन चित्रपटांविषयी... 
बातम्या आणखी आहेत...