आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडी नाइट्स'साठी 'दादी'ने नाकारली सलमानच्या सिनेमाची ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुटकी उर्फ गुत्थी म्हणजेच सुनील ग्रोवरचा प्रसारित होणा-या नवीन शोसाठी दादी अर्थातच अभिनेता अली असगरने
शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्याने स्पष्ट केले आहे, की तो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्येच काम करणार आहे, कारण त्याच्यासाठी प्रमाणिकपणा सर्वात महत्वाचा आहे.
त्याने या शोसाठी सलमान खानसोबतचा 'किक' सिनेमासुध्दा सोडला आहे, कारण साजिद नाडियाडवालाने त्याला एक महिन्याची तारीख मागितली होती.
एवढेच नाही तर, सलमानने स्वत: अलीला सांगितले होते, की 'किक'ची विशेष भूमिका त्यालाच करायची आहे. परंतु अलीसाठी त्याच्या मालिका 'जीनी और जूजू' आणि 'कॉमेडी नाइट्स...'साठी इतका मोठा ब्रेक घेणे शक्य नव्हते. अशावेळी त्याने या सिनेमामध्ये सलमानसोबत काम करण्याची संधी सोडून दिली.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, जर सुनील ग्रोवरने त्याच्या नवीन शोमध्ये अलीला कोणती मोठी भूमिका दिली तरीही अली 'कॉमेडी नाइट्स...' शो सोडणार नाही.