आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानची 'शेजारीण' म्हणून चर्चेत आहे ही अॅक्ट्रेस, या बॉलिवूड अभिनेत्याची आहे मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'बिग बॉस 11' चे दोन प्रोमो आतापर्यंत समोर आलेले आहेत. या दोन्ही प्रोमोमध्ये यावेळेची बिग बॉसची थीम शेजाऱ्यांवर असणार आहे असे संकेत मिळत आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये दिसलेली अभिनेत्री सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय आहे. या प्रोमोमध्ये सलमान घरातील काम करताना दिसत आहेत आणि त्याच्या घरासमोरील शेजारीण त्याला लग्न करण्याविषयी सांगते. यावर सलमान तिला, 'आपको क्या जल्दी थी। आप अगर सिंगल होतीं तो कर लेता शादी' असे म्हणून छेडतो. कोण आहे ती तरुणी..
 
- प्रोमोमध्ये सलमान खानच्या शेजारणीचा रोल करणाऱ्या तरुणीचे नाव आहे आदिती. दयावान' (1988) आणि 'दीवाना मुझसा नहीं' (1990) या चित्रपटात काम केलेल्या जैनेन्द्र प्रताप सिंह यांची ती मुलगी आहे. 
- आदितीने तेलुगु रोमांटिक-कॉमेडी फिल्म 'Guppedantha Prema'मध्येही काम केले आहे. याशिवाय पाकिस्तानी फिल्म 'वजूद' मध्येही तिने काम केले आहे. 
- आदिती कथ्थक डान्सर आहे आणि अगोदरपासूनच अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न होते. याचा खुलासा आदितीने एका मुलाखतीत केला आहे. सलमानसोबत काम केल्यानंतर सध्या ती खुशीत आहे. 
- आदिती इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह आहे आणि नेहमीच ग्लॅमरस फोटोज् शेअर करत असते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आदितीचे काही खास फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...