आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss'च्या घरात जाणार अलोकनाथ? Jokesच्या माध्यमातून उडवली जातेय खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'बिग बॉस' हा भारतातील लोकप्रिय टीव्ही शो आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण त्याचे सातवे पर्व आहे. 2006पासून सुरू झालेल्या या शोने 2013पर्यंत 7 पर्व यशस्वीपणे पूर्ण केले. आता 8व्या पर्वासाठी स्पर्धकांचा शोध सुरू झाला आहे. ऐकिवात आहे, की यावेळी 8व्या पर्वात सिनेमा आणि टीव्ही जगातील बाबूजी अर्थातच अलोकनाथ हे सहभागी होणार आहेत.
'बिग बॉस 8' यावेळी ऑक्टोबरमध्ये दाखवल्या जाऊ शकते. आता या गोष्टीच्या सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. बातम्यानुसार, अलोकनाथ यांची एंट्री 'बिग बॉस'मध्ये निश्चित असल्याचे मानले जात आहे. परंतु त्यांच्याकडून या गोष्टीचा खुलासा झालेला नाहीये. प्रत्येक सिनेमात आणि टीव्ही मालिकांमध्ये वडिलांची भूमिका साकारणा-या अलोकनाथ यांच्यासह टायगर श्रॉफ, उदय चोप्रा आणि यामी गौतमी यांचीसुध्दा टि्वटरवर खिल्ली उडवली जाते.
'बिग बॉस'च्या प्रत्येक पर्वात वादग्रस्त सेलेब्सची एंट्री होत असते. कारण या शोला टीआरपी मिळवणे सोपे जाते. त्यामुळे या पर्वात अनेक चेहरे तुम्हाला धक्का देणारे असणार आहेत. अलोकनाथ जर या शोमध्ये सहभागी झाले तर त्यांच्यासाठी या शोचा प्रवास सोपा नसणार.
सलमान शो होस्ट करण्याच्या गोष्टीवर अद्याप सस्पेन्स
2010, 2012 आणि 2013 या शोला सलमान खानने होल्ट केले होते. 7व्या पर्वात त्याने पुढील पर्व होस्ट न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता हे पर्व कोण होस्ट करणार यावर सस्पेन्स कायम आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा 'बिग बॉस'मध्ये जाण्याच्या बातम्यांनी अलोकनाथ यांच्यावर कसे जोक्स बनले...