आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sooraj Barjatya, Aloknath, Renuka Shahne At The Launch Of ‘Mere Rang Mein Rangne Waali’

मालिकेच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचली सलमानची ऑनस्क्रिन वहिनी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रेणुका शहाणे डावीकडे आणि समृद्ध बावासोबत प्रणाली गोहारे)
मुंबईः लाइफ ओके वाहिनीवर लवकरच 'मेरे रंग में रंगने वाली' ही नवी मालिका दाखल होणार आहे. गुरुवारी या मालिकेतील सर्व कलाकार पहिल्यांदा मीडियासमोर आले. फिल्म सिटीत हा लाँचिंग इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.
'मेरे रंग में रंगने वाली' या मालिकेत समृद्ध बावा हा नवोदित कलाकार एलडीची भूमिका साकारणार आहे. तर प्राणाली होबारे राधाच्या भूमिकेत झळकणार आहे. या इव्हेंटमध्ये निर्माचे सूरज बडजात्या मुलगा देवांशसोबत उपस्थित होते. याशिवाय आलोकनाथ, महेश ठाकूर, डॉली सोही, विष्णू बोलवानी, सुचित्रा बांदेकरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. येत्या 17 नोव्हेंबर रोजी ही मालिका लाइफ ओके वाहिनीवर सुरु होणार आहे.
इव्हेंटमध्ये रेणुका शहाणेची उपस्थिती होती. या मालिकेद्वारे रेणुका छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. यापूर्वी ती 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. रेणुकाने ब-याच हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 'हम आपके है कौन' या ब्लॉकबस्टर सिनेमात रेणुकाने सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये क्लिक झालेली 'मेरे रंग में रंगने वाली' या मालिकेतील स्टारकास्टची छायाचित्रे...