आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चंद्रमुखी चौटाला' नव्हे, ही आहे 'बजरंग पांडे'ची रिअल लाइफ पार्टनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : संजीदा शेख आणि आमिर अली)
मुंबई - सब टीव्ही वाहिनीवरील 'एफआयआर'मधील बजरंग पांडे उर्फ अभिनेता आमिर अली लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील 'एक हसीना थी' या थ्रिलर मालिकेत झळकणार आहे. या शोमध्ये तो कायमस्वरुपी येणार नसून त्याची कॅमिओ भूमिका या मालिकेत असणार आहे. यावेळी तो त्याची रिअल लाइफ जोडीदार संजीदा शेखसह रोमान्स करताना दिसेल. संजीदा या मालिकेत लीड रोलमध्ये झळकत आहे. दुर्गा ठाकूर हे तिच्या पात्राचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोमध्ये आमिरची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. त्याचे पात्र कथेला नवीन वळण प्राप्त करुन देणारे आहे. लवकरच आमिर या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
'नच बलिए 3' मध्ये एकत्र झळकले होते दोघे...
2006 मध्ये छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या 'क्या होगा निम्मो का' या मालिकेत संजीदा सर्वप्रथम झळकली होती. त्यानंतर 'कयामत' (2007), 'क्या दिल में है' (2008), 'जाने पहचाने से अजनबी' (2010), 'हाय पडोसी, क्यों है दोषी' (2011) आणि 'बदलते रिश्तों की दास्तान' (2013) या मालिकांमध्येही संजीदाचे दर्शन घडले. 2007 मध्ये 'नच बलिए'च्या तिस-या पर्वात संजीदा स्पर्धक म्हणून झळकली होती. या पर्वात आमिर अली तिचा पार्टनर होता. तेव्हा या दोघांचे लग्न झाले नव्हते. त्याकाळात हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.
2012 मध्ये केले लग्न...
संजीदा आणि आमिरने आपल्या प्रेमाच्या नात्याचे रुपांतर 2012मध्ये लग्नात केले. 2 मार्च 2012 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले.
सध्या 'एफआयआर'मध्ये झळकतोय आमिर...
'कहानी घर-घर की' (2005), 'साराभाई v/s साराभाई' (2005), 'वो रहने वाली महलों की' (2007), किस देश में है मेरा दिल' (2008) आणि 'भास्कर भारती' (2009) या मालिकांमध्ये झळकलेला आमिर सध्या सब टीव्हीवरील एफआयआर या मालिकेत झळकतोय. या मालिकेत तो बजरंग पांडेची भूमिका साकारतोय. या मालिकेतील त्याची आणि चंद्रमुखी चौटाला (कविता कौशिक) सोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावतेय. छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही आमिर झळकला आहे. 'ये क्या हो रहा है' (2002), 'राख' (2010) आणि 'आय हेट लव स्टोरीज' (2010) या सिनेमांमध्ये आमिर झळकला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिअल लाइफ पार्टनर संजीदासोबतची आमिर अलीची खास छायाचित्रे...